टोकावडे येथील विद्यालयाच्या प्रवेशद्वाराला कै.सिताराम पांडुरंग पवार यांचे नाव

मुरबाड - जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाड संचालित टोकावडे येथील शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टोकावडेच्या प्रवेशद्वाराला ग्रामपंचायत टोकावडेचे माजी सरपंच कै.सिताराम पांडुरंग पवार यांचे नाव माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष गोटीराम पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष व शिक्षक सेना संघटक चंद्रकांत पवार व कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस प्रा.प्रकाश पवार यांनी प्रवेशद्वारासाठी आर्थिक मदत केली म्हणून संस्था व विद्यालयाच्यावतीने दोन्ही बचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचीव पांडुरंग कोर,संचालक | मधुकर मोडपे, सरचिटणीस भास्कर डरड सर,शालेय समितीचे चेअरमन संजय पवार, चंद्रकांत पवार सर,सरपंच डिराबाई डिलम,हरीभाऊ राऊत,गोपाळ | कदम,कबरु तिवार,बंदू पवार,दत्तात्रय पवार,तानाजी पगार.सोमनाथ भोलप.संभाजी गोडांबे.सेवक बोराडे,काळुराम केदार,कांताराम पवार,बामन भला व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य | बि.बा.यशवंतराब सर व समसंचलन काशिनाथ | गोडांबे यांनी केले


.