(भिवंडी, सत्यजान तरे) - भातसा भरणातून शेतकयांना पाणीपुरवठा करण्यासाठी डाव्या व उजव्या कालव्याच्या कामासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उलब ठाकरे यांच्याकडे आज केली. त्याचबरोबर मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के निभी देण्याची मागणीही खासदार पाटील यांनी केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अभिवेशनात महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री विश्रामगृहात बैठक बोलाविली होती. त्यावेळी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी ही मागणी केली. भातसा भरणातून लाबा व उजवा कालव्याचे काम अद्यापी पूर्ण झालेले नाही, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी २२ टक्के लोकसंख्या मुंबई-ठाण्याच्या शहरी भागात राहते. या कालव्याचे काम पूर्ण झाल्यास शेतकयांना भाजीपाल्यास विविध पिके घेता येतील. तसेच शहरी भागालाही भाजीपाल्याचा पुरवठा करता येईल. शेतकयांचे जीवन सुजलाम सुफलाम होण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लावाव उजव्या कालव्याच्या कामाचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली.
मुरबाड कालवे यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठ्या-खासदार कपील पाटील