क्लस्टरबाबत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ठाण्यातील क्लस्टर योजनेचा मुहूर्त साधण्याचा दावा ठाणे पालिकेने केला होता. परंतु, तो फोल ठरल्यानंतर आता येत्या ६ फेबुवारी रोजी क्लस्टरचे भूमिपूजन निक्षित झाले आहे. मात्र, या क्लस्टरला शासनाची अद्याप मंजुरीच नसल्याने ही लगीनघाई कशासाठी असा सवाल भारतीय जनता पक्षाचे ठाणे क्लस्टरबाबत सुस्पष्टता जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेचे हे प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत असून जोपर्यत शासनाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात करता येत नाही. भूमिपूजनास दोन दिवस असताना पालिकेचे अधिकारी आता परवानगी मिळवण्याच्या कामाला लागले आहेत. अशी माहितीही डावखरे यांनी दिली. क्लस्टर भमिपजन आणि वास्तव याबाबत आज दिनांक फेथुधारी रोजी ठाण्यातील भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साभताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला (अर्बन रिन्यूअल प्लॅन) मंजुरी मिळालेली नसून, अद्यापी आयओडी (इंटिमेशन ऑफ डिसोंपूब्बल) देण्यात आलेली नाही. त्यामुळे ई-भूमिपूजन करण्यासाठी लगीनघाई का केली जात आहे, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेभाले. त्याचबरोबर गावठाणे व कोळीवाडे वगळण्याबाबात पालकमंत्री एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री उब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करुन भूमिका जाडोर कराबी, क्लस्टरबाबत सुस्पष्टता हवी. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये, अशी भूमिका मांडत आ. डावखरे यांनी ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर क्लस्टरबाबत कोणतीही माहिती नसल्याकडे लक्ष वेधले. क्लस्टर योजना कोळीवाडा, गावठाणात राबबू नये, गावठाणांचे सीमांकन करावे, गावठाणासाठी नवीन विकास योजना बनवाबो. अशा मागण्या योजनेच्या सुरुवातीपासून प्रलंबीत आहेत. मात्र याकडे पालकमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. क्लस्टर योजनेची सुरुवात करण्यासाठी भाजप सरकारनेच पुढाकार घेत त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या योजनेला मंजुरी दिली. मात्र शिवसेनेने सोयिस्कर रित्या पोस्टर, बॅनरबाजीकरून त्याचे श्रेय स्वत:कडे घेतले. आजही मागील सरकारच्या अनेक योजनांना स्थगिती देण्यात आली असताना केवळ क्लस्टर योजनेला गती देण्याचे काम सरकार करीत आहे. हे करीत असताना क्लस्टर राबविण्यात येणारे अडथळे आणि परवानग्या इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या सगळ्या समस्या पालकमंत्रींना माहिती आहेत. कारण मागील बेळेसही तेच पालकमंत्री होते आजही तेच आहेत. केवळ वरची पाटी बबलली आहे अशी खोचक टिका आमदार संजय केळकर यांनी केली. क्लस्टरला विरोध नाही. मात्र, सर्व प्रक्रिया ही नियमानुसार झाली पाहिजे, त्या योजनेचा एसआरए होऊ नये असे मतही केळकर यांनी व्यक्त केले.
क्लस्टरबाबत सुस्पष्टता हवी- आ. डावखरे