महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील १८५ शिक्षकांना कोकणरत्न शिक्षक पुरस्कार

ठाणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पवित्र व प्रामाणिकपणे काम करणाया १८५ शिक्षकांना एन.के.टी.ठाणे कॉलेज येथे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.आमदार पाटील यांनी आपले शिक्षकांविषयी असलेले , प्रेम व्यक्त करतांना सांगितले कार्यक्रमाचे सातत्याने शिक्षक आणि कुणबी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी सतत पाठपरावा करणार २० टक्के अनुदानित करायचे ४० टक्के ब२००५ पूर्वी सर्व शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लवकरच लाग करण्याकरीत प्रयत्न करणार आहे. गुणवंत शिक्षकांचा कोकण रत्न पुरस्कार पुढील ३ बर्ष होईल असे पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून सांगितले.पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष श्री तुरूंकमाने सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले श्री गणेश शिंदे यशदा पुणे यांनी शिक्षकांना अनमोला मार्गदर्शन केले सदर कर्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक नानजीभाई ठक्कर, ठाणे जिल्हा परिषद ठाणेचे उपाध्यक्ष सुभाष पवार ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री.बढे पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष तुरूंकमाने सर,जनसेवा सेवक पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष मनोज महाजन,राजेश मदने, सचिव वैभव म्हात्रे, खाबांळकर आणि संघटनेचे इतर पदाधिकारी भनाजी खापरे,आणि पुरोगामी शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी आणि ठाणे विभागातील मुख्याध्यापक ,शिक्षक बंद मोठ्या संख्येने उपस्थित हात. मुरबाड तालुक्यातुन डॉ.सौ.गिता राजेंद्र विशे, सौ.स्मिता प्रसन्न परळकर, डॉ.प्रमोद जानू पोगरे, शरद मारुती सोनावणे, ईशर गोरुले, जयवंत पांडरंग सांडे,अनंता दत्तात्रय पवार, संदीप दत्तात्रय पवार, शुभाजी दाजी भावार्थे,नारायण शिवराम बाबरे, जयराम बुधाजी खापरे, दत्तात्रय कृष्णा म्हारसे, वाळकू इंदा बांगारा यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अस्मिता पाटील यांनी केले